एरंडोल (प्रतिनिधी) :– एरंडोल पोलिसांनी तालुक्यातील खर्ची खु. येथील दोघांना हातभट्टीची दारू तयार करून विक्री करतांना पकडुन त्यांचे दारू बनविण्याचे अड्डे उध्वस्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पो.स्टे.हद्दीतील खर्ची खुर्द या गावी सीताराम नाईक रा.खर्ची याचे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा मारुन रु.३०३०/- किंमतीचा मुद्देमाल त्यात हातभट्टीचे कच्चे रसायन असा माल पकडुन जागीच नष्ट केला, तर याच ठिकाणी सुखदेव नाईक याचे गावठी दारु हातभट्टी दारु अड्डयावर छापा मारुन रु. ४२००/- चा मुद्देमाल त्यात गुळ मिश्रीत कच्चे रसायन असा माल पकडुन जागीच नष्ट केला यामुळे या दोन्ही आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारू बंदी कायद्यानुसार एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.तुषार देवरे,परिविक्षाधिण पी.एस.आय.अविनाश दहीफले, रिंगणगाव बीट जमादार पो.हे.का चंद्रकांत पाटील, मिलिंद कुमावत, अकील मुजावर यांनी पार पाडली.