एरंडोल (प्रतिनिधी) :-येथील पंचायत समिती कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक वय ५० वर्ष हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी बी.एस.अकलाडे यांनी दिली आहे.
दरम्यान सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गेल्या ५ ते ६ दिवसांपासून जळगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल आहेत.त्यांनी तालुक्यातील वरखेडी चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला तेंव्हा नोडल ऑफिसर म्हणुन काम पाहिले होते.
ते१ जुन ला एरंडोल येथे कामावर हजर होते.त्यानंतर ते तब्येत खराब असल्याने रजेवर गेले.ते जळगाव येथुन ये – जा करतात.विशेष म्हणजे यापुर्वी याच कार्यालयातील असोदा येथुन ये – जा करणारा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळुन आला होता.तर आता दुसरा कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बाहेर गावावरून ये – जा करणाऱ्या दोघ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असल्याने सर्व भयभीत आहेत.