एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यात प्राप्त २६ स्वाब अहवाल पैकी ५ रुग्ण सोमवारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात जहांगीर पुरा येथील २९ युवक, ४४ वर्षीय पुरुष, मारवाडी गल्लीतील ४० वर्षे खासगी डॉक्टर, २२ वर्षी त्यांचा कंपाउंडर, कासोदा येथील १६ वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे. तसेच धुळे येथून दोन पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले त्यात एरंडोल येथील कागदी पुरा भागातील 32 वर्षे पुरुष व कासोदा येथील ६९ वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.
याप्रमाणे सोमवारी एकूण ७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे त्यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या ५८ झाली आहे. एरंडोल येथील मुजावर वाड्यातील ५५ वर्षीय रुग्णाचे रविवारी रात्री जळगाव येथे निधन झाले त्यामुळे कोरोना च्या पुढची संख्या आता तीन झाली आहे. एरंडोल शहरात कोरोना बाधितांची संख्या ४० व ग्रामीण भागातील १२ इतकी आहे.
५८ रुग्ण संख्या पैकी २२ रुग्णांवर उपचार होऊन ते बरे झाले आहेत. ३४ रुग्ण कोरूना बाधित आहेत. पैकी २० रुग्ण एरंडोल कोविंड सेंटरला उपचारार्थ दाखल आहेत तर १० रुग्ण जळगाव सेंटरला उपचार घेत आहेत.
माळीवाडा, मुल्लावाडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बालाजी मढी, मोरांकर गल्ली (पाताळ नगरी)
या भागातील कोरोना बाधित होते ते यशस्वी उपचार घेऊन कोरणा मुक्त झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी दिली आहे.