एरंडोल (प्रतिनिधी) : येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी एरंडोल तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस पक्षातर्फे एरंडोल तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य दुकानात मोठ्याप्रमाणावर काळाबाजार होत असुम तो थांबविण्यासाठी निवेदन दिले आहे. निवेदनात केंद्र सरकार व राज्य सरकारने गोरगरीब जनतेसाठी धान्य पुरवठा केला जात आहे.
परंतु एरंडोल तालुका व शहरातील स्वस्त धान्य दुकानदार हे नागरिकांना पुरेसे धान्य देत नाही.काहिना वेगवेगळी कारणे देऊन परत पाठवत आहे.या बाबत आपण सर्व रेशन दुकानदाराची चौकशी करावी तसेच ज्या रेशन दुकानदाराचे खाजगी किराणा दुकान आहेत.त्यांच्या स्वस्त धान्य दुकानावर मोठ्या प्रमाणात धान्याच्या काळाबाजार सुरू आहे. या बाबत त्वरीत दखल घ्यावी व नागरिकांना धान्य मिळून द्यावे असे नमुद केले आहे.तसेच जर आपण सदर निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही एरंडोल तालुका व शहर काँग्रेसतर्फे स्वतः दुकानांवर जाऊन स्वतः नागरिकांना धान्य वाटप करू व अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपण जबाबदार रहाल असा इशारा देखील दिला आहे.