एरंडोल (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुका शिवसेनेतर्फे चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्या निषेधार्थ निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी एरंडोल पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती पासून आमदारांच्या निषेधाचे फलक घेऊन पोलीस स्टेशन पर्यंत घोषणाबाजी केली.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,उपजिल्हा संघटक किशोर निंबळकर,तालुका संघटक राजेंद्र चौधरी,जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील,प्रभारी सभापती अनिल महाजन,महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रतिभा पाटील,शिवसेना गटनेत्या दर्शना ठाकूर, एरंडोल शिवसेनेचे नेते शालिग्राम गायकवाड, एरंडोल शहर प्रमुख कुणाल महाजन, शहर संघटक नितीन बिर्ला,उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी,आनंदा चौधरी, विभाग प्रमुख रवींद्र जाधव,छोटू मराठे,देशमुख,राजेंद्र राठोड, सुनील मराठे,कुणाल पाटील,कृष्णा ओतारी,राज पाटील,चिंतामण पाटील,विजय ठाकूर,रमेश जमादार, अजय पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळी – एरंडोल येथे तालुका शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,तालुका प्रमुख वासुदेव पाटील,प्रभारी सभापती अनिल महाजन,किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी आदी.