खडके बु (वार्ताहर) : खडके बु ता,एरंडोल येथील प्रगतिशील शेतकरी सौ माधुरी जगदिश पाटील यांची एरंडोल तालुका आत्मा अंतर्गत स्तरीय सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली,एरंडोल तालुका स्तरीय सल्लागार समिती ही नव्याने पूनर्गठीत करण्यात आली.
सदर शेतकरी सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे,असे आशयाचे पत्र जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले.
सौ माधुरी पाटील यांच्या शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल एरंडोल पारोळा चे आमदार चिमणराव पाटील यांच्या कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,सौ माधुरी पाटील हे शिवसेनेचे कट्टर समर्थक जगदिश रवींद्र पाटील यांच्या पत्नी तर खडके बु ग्राम पंचायत चे माजी उपसरपंच रवींद्र त्रंबक पाटील यांच्या सून होय, त्यांच्या निवडी बद्दल संपूर्ण गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.