एरंडोल ग्रामिण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा

0

एरंडोल – येथे ग्रामिण  रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा व एरंडोल ग्रामिण रूग्णालयात ट्रामा सेंटर सुरू करण्यासाठी आमदार  चिमणराव पाटील यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. यावेळी ह्या विषयाचा लवकरात लवकर पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी दिले.  याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, पं.स.उपसभापती अनिल महाजन, माजीनगराध्यक्ष किशोर निंबाळकर, दिलीप रोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विवेक पाटील,  कुणाल महाजन, अतुल महाजन,परेश बिर्ला, राजेंद्र चौधरी, नितीन बिर्ला शालिग्राम गायकवाड, जगदीश पाटील,रविंद्र जाधव, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.