एरंडोल (प्रतिनिधी) – येथील विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा एरंडोल आण्णि जळगांव येथील श्री गोळवलकर गुरूजी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एरंडोलला दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील रा. ति. काबरे विद्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे एक अनमोल पुस्तक भेट देण्यात येईल असे देखील आयोजकांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कळविले आहे.