एरंडोलमध्ये दुसऱ्यांदा वीजचोटी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

 एरंडोल : शहरातील एका वीजग्राहकाला दुसऱ्यांदा वीजचोरी करताना पकडल्याने महावितरणने त्यावर थेट पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

एरंडोल येथील साईनगरमध्ये राहणाऱ्या शिरीष पुंडलिक गायकवाड या ग्राहकाकडे घरगुती वीजजोडणी आहे .मात्र हा ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करत असल्याचा संशय महावितरणला आल्याने त्याचे मीटर जप्त करण्यात आले . महावितरणने प्रयोगशाळेत मीटर तपासले असता त्याची गती कमी करून वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले . तब्बल ९५०५ युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणकडून या ग्राहकास २ लाख ५४ हजार ३६८ रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. हे बिल ग्राहकाने भरले तर नाहीच परंतु यापूर्वीही हा ग्राहक वीजचोरी करताना आढळला होता.

डिसेंबर २०१९ मध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी या ग्राहकास १० हजार ३६५ रुपये वीजचोरीचे बिल व तडजोड शुल्क ८ हजार रुपये आकारण्यात आले होते.मात्र त्यावेळी ही रक्कम भरून सदर गुन्ह्यात त्यावेळी ही रक्कम भरून सदर गुन्ह्यात ग्राहकाने तडजोड केली होती.

मात्र आता घरगुती वीज वापरासाठी दुसऱ्यांदा वीजचोरी पकडल्याने या ग्राहकाविरुद्ध महावितरणने थेट पोलिसांत धाव घेतली . महावितरणच्या एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता कुणाल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरीष पुंडलिक गायकवाड या ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . सदर कारवाई महावितरणच्या एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.