एरंडोल (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ.सुरेश पाटील यांची नुकतीच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या एरंडोल तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सदर निवड डॉ.पाटील यांच्या पर्यावरणीय कार्याचा आढावा घेऊन व त्यांचे पर्यावरणीय कार्याविषयी असलेल्या तळमळ तसेच संस्थेअंतर्गत त्यांच्याकडून विभागात निस्वार्थी व प्रामाणिक कार्य करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे.त्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच संस्थेची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी नियोजन समिती यांच्या सल्ल्याने व जळगांव जिल्हा युवा अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.डॉ.पाटील यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.