पारोळा,दि. 5-
येथील बालाजी शैक्षणिक संकूलाचे सौ.एम.यु.करोडपती इंग्लीश मेडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष यु. एच. करोडपती, सचिव डॉ. सचिन बडगुजर, विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत पाटील, राधिका बडगुजर आदी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता 9 वी व 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारुन सर्व कामकाज हताळले. तसेच सर्व शिक्षकासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.