एनटीएसच्या तयारीसाठी कोकमठाणला राज्यस्तरीय शिबीर

0

भुसावळ :– संपूर्ण महाराष्ट्रातून एमटीएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या एनटीएस परीक्षा तयारीसाठी कोकमठाण येथील आत्मा मालिक गुरुकुलमध्ये नुकतेच राज्यस्तरीय शिबीर पार पडले. या शिबिरात इतिहास विषयाचे तज्ज्ञ म्हणून भुसावळ येथील द. शि. विद्यालयाचे उपशिक्षक व बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित शिबीरात राज्यभरातून 85 विद्यार्थी सहभागी झाले होते. हे शिबीर 6 ते 11 मे  2019 दरम्यान घेण्यात आले. शिबीरात मानसिक क्षमता चाचणी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, गणित या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी राज्यभरातून विषय तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यातील इतिहास विषयासाठी जळगाव जिल्ह्यातून एकमेव डॉ. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. येत्या 12 जून रोजी एनटीएस परीक्षा होणार आहे. त्याची तयारी म्हणून घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबीर  यशस्वीतेसाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूरचे प्राचार्य प्रा. रवींद्र रमतकर, समन्वयक अधिव्याख्याता डॉ. सीमा पुसदकर, डॉ. उर्मिला हाडेकर, विषयतज्ञ कीर्ती पालटकर, रामचंद्र चुकांबे, लेखापाल सुरेश चोपडे, चेतन रॉय, त्याचप्रमाणे आत्मा मालिक गुरुकुलचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, चेअरमन पटेल सर, प्रशासकीय अधिकारी सुधाकरराव मालिक, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र पवार, प्राचार्य निरंजन डांगे, सहकारी संजय दिघे, परशुराम राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.