एजेएफसी च्या प्रदेश सरचिटणीसपदी हाणमंतु देसाई

0

नांदेड ( प्रतिनिधी) : नांदेड जिल्हाचे भुमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय हिंदी स्वतंत्र प्रजावार्ता चे संपादक हाणमंतु देसाई यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेड्स सर्कल सलगनित राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदावर बिन विरोध निवड करण्यात आली,

सदरील निवड हि केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल व प्रदेश अध्यक्ष दिपक नागरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ एप्रिल रोजी ओनलाइन बैठक घेऊन सदरील निवड करण्यात आली आहे. हाणमंतु देसाई हे नाव पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्या बद्दल बहु चर्चित असते देसाई हे सलग ५ वर्षा पासुन नांदेड जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होते त्यांची उल्लेखनीय कार्य शैली पाहुन सदरील निवड करण्यात आली आहे हाणमंतु देसाई यांचे निवडी बद्दल राजकीय सामाजिक व अनेक क्षेत्रातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.