एक दौड़ स्वस्थ समाज के लिए १६ फेब्रुवारीला

0

जळगाव दि १२- स्वस्थ आरोग्याप्रती समाजात सजगता वृद्धिंगत व्हावी तसेच समाजबांधव एकत्रीत येवुन विचारांची देवाणघेवाण होऊन नाती अधिक घट्ट व्हावीत या उद्देशाने येथील सिंध कि कलिया सोशल गृप व जळगाव सिंधी युवा मंच च्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी एक दौड़ स्वस्थ समाज के लिए सिंध मॅरेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक पंकज दारा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विशिष्ट समाजासाठी असलेली ही स्पर्धा व स्पर्धेसाठी हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी केलेली पूर्वनावनोंदणीचा प्रतिसाद ही बाब बहुदा एकमात्र असणार त्यामुळे गिनीज बुक वा लिम्का बुक ऑफ़ /वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये ही नोंद घेतली जाण्याची दाट शक्यता असून स्पर्धेचे आयोजक त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेला खानदेश सेन्ट्रल मॉल, नेहरू चौक येथुन सकाळी ६.३० वा प्रारंभ होणार असुन ३ कि.मी.५ कि. मी १० कि.मी. अशा वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाणार आहे. विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच आकर्षक पारितोषिके देवून गौरवान्वित येणार असून या स्पर्धेसाठी अमरशहिद संत कंवरराम ट्रस्ट,पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत, सर्व पूज्य कंवरनगर ,उबराव भावलपूर ,कशमोर ,सिंधी शहर ,करमपूर मोहर ,नशिराबाद ,लाडी लोहाना इत्यादी सर्व सिंधी पंचायतींचे प्रोत्साहन व पाठबळ लाभले आहे. सिंधी समाज बंधू-भगिनींनी व क्रीडा रसिकांनी सिंध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रेश्मा बेहरानी, विजय शामलानी, अनुप तेजवानी, सुरेश चावला, धिरज वालेचा, पिंटू लुल्ला, दीपक कुकरेजा, संगीता चावला, रितू रायसिंघाणी, शोभा पारवाणी,ओम प्रकाश सचदेव, नरेश कावणा, सतीश मतानी, विजय कुकरेजा, अमित गगनाणी, प्रिया दारा, सुनीता वोतचंदानी, मोनिका दारा, डॉ. समीक्षा तलरेजा व इतर आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.