नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यांचे पार पडल्यानंतर विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांनी एक्झिट पोलची आकडेवारी जाहींर केली आहे त्यानुसार देशात आता पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचेच सरकार पुर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजार उघडताच निर्देशांकाने उसळी घेतली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स ८०२ अंकांनी वाढला असून निफ्टीतही २२९ अंकांची वाढ नोंदवली आहे.
शेअर बाजारात ८०२ अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स ३८,८१९.६८ अंकांवर उघडला. तर निफ्टीतही २२९ अंकांची वाढ होऊन ११,६९१.३० अंकांवर उघडला. दरम्यान, खरा निकाल २३ तारखेच्या सायंकाळी उपलब्ध होणार आहे. या निकालाचा परिणाम २४ मे रोजी होणाऱ्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे.