Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एका ऑटो चालकाने केला दुसर्‍याचा खून
    गुन्हे वार्ता

    एका ऑटो चालकाने केला दुसर्‍याचा खून

    By April 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव (प्रतिनिधी) ऑटोमध्ये प्रवासी बसविण्याच्या कारणावरून दोन ऑटो चालकामध्ये वाद झाल्याने एकाने दुसर्‍यावर कुकरीने वार करून खून केल्याची घटना 1 एप्रिल रोजी सायंकाळी निर्मल टर्निंग पॉईंट ऑटो स्टॉप येथे घडली.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, येथील निर्मल टर्निंग जवळील ऑटो स्टॉपवर मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण उर्फ पिंचू रा. लक्कडगंज व अजय विनायक आवटे रा. सतीफैल वय 45 हे दोघे आपला प्रवासी ऑटो निर्मल टर्निंगजवळील ऑटो स्टॉपवर लावून प्रवासी वाहतूक करतात. दरम्यान 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मेहरसिंग चव्हाण उर्फ पिंचू व अजय आवटे यांच्यात ऑटोमध्ये प्रवासी बसविण्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यामध्ये मेहरसिंग चव्हाण याने अजय आवटे याच्या पोटात कमरेजवळ धारदार कुकरीने दोन वार केले. या हल्ल्यात अजय आवटे हा खाली पडला. त्यानंतर आरोपी मेहरसिंग चव्हाण यानेच अजय आवटे यास स्वतःच्या ऑटोमध्ये बसवून सामान्य रूग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. तद्नंतर आरोपी मेहरसिंग चव्हाण हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होवून पोस्टेला घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच शहर पोस्टेचे एपीआय पांडुरंग इंगळे यांच्यासह पोलिसांनी सामान्य रूग्णालयात धाव घोतली. तर शिवाजी नगर पोस्टेचे ठाणेदार सुनिल हुड यांनी कर्मचार्‍यासह घटनास्थळी जावून पंचनामा केला. तर घटनास्थळावर दंगाकाबू पथकास पाचारण करून चोख बंदोबस्त लावला होता. मृतक अजय आवटे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा मुलगी असा आप्त परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif