एकलव्य संघटना आदिवासी मेळाव्यात चार हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती : कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
पाचोरा —संघटन कौशल्य ही आमच्या आदिवासी समाजाची आनुवंशिकता आहे. गेली अनेक वर्षे आमचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने आमचा छळ केला.मात्र आम्ही आता एकलव्य संघटनेच्या माध्यमातून राज्यात संघटित झालो आहोत. आम्ही ज्याच्या सोबत राहू तेथे प्रामाणिक राहतो. माझ्या सारख्या ऊस कामगाराच्या मुलाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी राज्यमंत्र्यांचां दर्जा असलेले म्हाडाचे अध्यक्ष केले. आता व्यक्तीची पूजा पेक्षा समाजाच्या शक्तीची पुजेला किंमत आहे. आमची जळगाव लोकसभा मतदारसंघात मोठी शक्ती व संघटन आहे. मी सामाजिक चळवळीतून वाढलेला कार्यकर्ता आहे.माझ्यासारखाच उन्मेष दादा चळवळीतून वाढलेला सर्व सामन्याचा मुलगा आहे. तरुण तडफदार व आदिवासीच्या भल्याचा विचार करणारा या उमद्या उमेदवाराला खासदार करायचे आहे. यासाठी माझ्या आदिवासी समाजाचा तुम्हाला पाठींबा आहे. उन्मेष दादा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी माझा समाज बांधवांनी अधिकाधिक संख्येने कमळाला मतदान करावे. असे आवाहन एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार शिवाजीराव ढवळे यांनी केले
आदिवासी समाज मोदींच्या पाठीशी — आ.किशोर आप्पा पाटील
समाजाच्या भल्यासाठी रात्रंदिवस काम करणारा, समाजाच्या भल्यासाठी मेहनत घेणारे नामदार शिवाजीराव ढवळे यांनी सर्व समाजाला न्याय हक्कासाठी एकत्र बांधून ठेवले आहे. एका आदेशाने रस्त्यावर उतरणारा समाज निर्माण करण्याचे काम ढवळे साहेबांनी केले आहे. याचा मला अभिमान वाटतो.आदिवासी समाजाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रभावी योजना आणल्या आहेत. त्यामुळे आदिवासी समाज मोठया प्रमाणावर भाजप सेना महायुतीसोबत आहे. आज शिवाजीराव ढवळे साहेबांचा आदेश आपणास मिळाला आहे. त्यामुळे आपला हक्काचा खासदार उन्मेष दादांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
चाळीसगावात आदिवासींना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून दिली -आ.उन्मेष पाटील
आदिवासी समाजाच्या विकासासाठी चाळीसगांवचा आमदार म्हणून आठ हजार जातीचे दाखले घरपोच देण्याचे काम केले. शासनाच्या योजनांचा लाभ वाड्या तांड्या वस्ती पर्यंत पोहचविल्या भविष्यात जेथे जेथे आदिवासी समाज बांधवांच्या उन्नती साठी उभे राहण्याची वेळ येईल तेव्हा मी आपल्या पाठीशी उभा राहीन. समाजाने मला मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद द्यावेत व कमळाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.