रामभक्त हनुमान जन्मोत्सव शहर व परिसरात आनंदाने साजरा
भुसावळ – चैत्र पौर्णिमेनिमित्त हनुमान जन्मोत्सव शहर व परिसरात विविध मंदिरात ठिकठिकाणी मोठ्या आनंदाने व विविध धार्मिक कार्यक्रम साजरा करून संपन्न झाले. शहरातील बहुतेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पवनसुत हनुमान की जय , बजरंग बली की जय , च्या घोषणांनी परिसर दुमदुमले.
बडा हनुमान मंदिरात सहस्त्रधारा महाअभिषेक व ५६ भोग अर्पण
येथील राममंदिर वार्डातील श्री बडा हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन उत्साहात साजरा करण्यात आला. दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ६वाजेपासून ते हनुमान जन्मापर्यंत म्हणजे १९ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ६वाजेपर्यंत २४ तास अखंड हनुमान चालीसाचे पठन गोविंद अग्रवाल, रविंद्र पुरोहीत, सुरेश शर्मा, योगेश अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी हनुमनंताला सहस्त्रधारा महाअभिषेक होणार आहे. पहाटे ३-३०वाजेपासून मंदिराचे प्रमुख प्रशांत वैष्णव व गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाअभिषेक संपन्न होणार आहे. सकाळी सुर्यादयाच्यावेळी हनुमंताचा जन्म सोहळा महाआरती होईल नंतर दिवसभर पंजेरी या प्रसादाचे वाटप करण्यात येऊन हनुमंताला ५६ भोगाचा [प्रसाद देण्यात आला यामध्ये फळे , मिठाई , सुकामेवा , नमकीन आदी भोग हनुमंताला अर्पण केन्यात आले. ५६ भोग करिता योगेश अग्रवाल , राम शर्मा , उमेश नेवे , शाम दरगड, अनुप अग्रवाल , यांचे सहकार्य लाभले . सायंकाळी ८ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत संगीतमय सुदर कांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्र्यक्रमास बजरंग भजनी मंडळ राधे राधे ,च्या सदस्यांचे सहकार्य लाभले .अखंड हनुमान चालीसा पठणास गोविंद अग्रवाल, पावन दरगड, चिंटू झंवर , गणेश साळी , सोमनाथ चौरसिया , सुरेश शर्मा , श्रीमती नलीनी नेवे , कोमल नेवे , मानसी नेवे , आदींचे विशेष सहकार्य लाभले . संपूर्ण दिवसभरात हजारो भाविकांनी हनुमानाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी सर्वत्र आलेल्या पाणी टंचाई मुळे दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे मिरवणूक रद्द करुन शहरवासीयांसाठी हनुमनांच्या नावाने पाण्याच्या टँकरचे लोकार्पण करण्याचे ठरविले आहे. तसेच यावर्षी चांगला पाऊस पडावा यासाठी सकाळी १० वाजता अखंड हनुमान चालीसा पूर्णाहूती तसेच हनुमान सहस्त्रनाम होम पूजन पंडीत सुरेश शर्मा यांच्या मार्गर्शनाखाली संपन्न झाले होम पूजेस सोमनाथ चौरसिया हे सपत्नीक बसले होते तसेच गोविंद अग्रवळ , उदय भावसार , महेश भावसार मी, रविंद्र पुरोहीत, राजू गुरव आदींनी पूजन केले .
कार्यक्रम यशस्वितेकरिता साठी श्रीबडा हनुमान मंदिराचे मुख्य ,पुजारी महंत प्रशांत रामदास वैष्णव, रविंद्र पुराहीत, सुखदेव प्रसाद चौरसिया, संतोष टाक, संतोष नागला,अशोक धांडे, रमेश इखनकर, भिमराज तळेले, बाबुदास वैष्णव , सुधाकर बैरागी , पंडित रवी ओम शर्मा , ऍड.गोकुळ अग्रवाल, , श्रीकृष्ण चोरवडकर, उमेश नेवे, यशवंतसिंग चौधरी, अक्षय वर्मा, अमोल ढाके, सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा, श्रीमती विमल रामदास वैष्णव , ऍड मेघा प्रशांत वैष्णव , भारती वैष्णव , राजश्री नेवे , सौ रजनी तळेले , दिनेश महाजन, सचिन पाटील, अजय पाटील, बबलू बर्हाटे, उमाकांत शर्मा, पवन दरगड, इखनकर बंधू, रोहीत नेमाडे, अमोल सोनार, चेतन शिरनामे, धनराज सोनार, सागर शिंदे, सनी चौधरी, मोटू वर्मा, सोमनाथ चौरसिया, डॉन पुरोहीत, अजय जादव, विश्वजोती मंडळ, अलंकार मंडळ, चेतना मंडल, , शिव मंडळ, आपले मंडळ, राज मंडळ, नवज्योती मंडळ, आदर्श मंडळ, ओम मंडळ, उपकार मंडळ, चिंतामणी मोरया गृप, जयलेवा गृ्रप, यारोकी दुनीया गृप, राममंदिर वार्ड, व विठ्ठल मंदिर वार्डातील सर्व मडळाचे कार्यकर्तेयांनी परिश्रम घेतले .शहरातील तसेच परिसरातील हजारो हनुमान भक्तांनी हजारोंच्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला .
विठ्ठल मंदिर वार्ड व छोटा मारुती मंदिर येथे सुद्धा हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आलायानिमित्त पहाटे कीर्तन व भजन कार्यक्रम करण्यात आले तसेच प्रसाद वाटप करण्यात आले . फटाक्यांच्या आतषबाजीत सनईच्या व वाद्यांच्या स्वरात जन्मोत्सव साजरा झाला . तदनंतर महाप्रसादाचे (भंडारा ) वाटप करण्यात आले . यशस्वितेकरिता विठ्ठल मंदिर वार्ड तरुण मित्र मंडळ , भजनी मंडळ , महिला भजनी मंडळ , यांचेसह मंदिर ट्रंष्टीने परिश्रम घेतले .