एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून मोठा धक्का

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी पहाटे अटक झाली

एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. तथापि, या समितीचा अहवाल हा मात्र अद्यापही विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे यांनी सातत्याने भाजप नेत्यांवर व विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे ते चर्चेत होते. त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ असे आव्हानही दिले होते. या पार्श्‍वभूमिवर मध्यंतरी खडसे यांची ईडीने चौकशी देखील केली होती. यानंतर काल रात्रभर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.