मुक्ताईनगर : गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतींपैकी 9 गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचाचा विजय मिळविला आहे. एकनाथ खडसे समर्थक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थकांचा आमने-सामने जल्लोष केला आहे.