Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»एकनाथराव खडसे अडचणीत; ईडीने दाखल केले १ हजार पानी आरोपपत्र
    ताज्या बातम्या

    एकनाथराव खडसे अडचणीत; ईडीने दाखल केले १ हजार पानी आरोपपत्र

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

    सदर आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, यांची नावे आहेत. या जमीन घोटाळ्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे.

    खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसीतील प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये त्यांच्यावर करण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 31 कोटी होती.

    मात्र, तो अतिशय नगण्य म्हणजे 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. या प्रकरणात मनीलाँड्रींग झाला असल्याचा ईडीला संशय आहे.

    दरम्यान, खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा यामध्ये समावेश आहे. भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीने गेल्या महिन्यात तब्बल 9 तास चौकशी केली होती. भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली होती. चौधरी यांच्या अटकेनंतर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मंदाकिनी खडसे यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी एका निवेदनाद्वारे 14 दिवसांची वेळ मागितली होती.

    खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली. ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

    Bhosari Land Scam Eknathrao Khadase pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif