एकनाथराव खडसेंना अडकवण्याचा भाजपच्या मंत्र्यांचाच डाव

0

कल्पना इनामदार यांचा आरोप : ललित टेकचंदनी आणि राजेश खत्री यांना दिली होती सुपारी

मुंबई, दि.24 –
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोअर टीममधील सदस्य कल्पना इनामदार यांनी मुंबई हायकोर्टात अंजली दमानिया यांच्याविरोधात एक कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. कल्पना इनामदार यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपच्या मंत्र्यांनीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्याची सुपारी दिली होती. एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांना अडकवण्यासाठी भाजप मंत्र्यांचे प्रयत्न सुरु होते, असे कल्पना इनामदार यांनी सांगितले.
एकनाथ खडसेंना अडकवण्यासाठी अंजली दमानिया यांनी ललित टेकचंदनी आणि राजेश खत्री यांना सुपारी देण्यात आली होत. हे दोघे आधी राष्ट्रवादी- काँग्रेससोबत होते. आता भाजपला मदत करत आहे, असल्याचा गौप्यस्फोट कल्पना इनामदार यांनी केला आहे. राजेश खत्री, ललित टेकचंदानी यांचे अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानियासोबत जवळचे संबंध आहे.
दमानिया यांनी पुरावा सादर करावा
सगळ्या गोष्टी घडल्या त्यावेळी माझ्याकडे काही पुरावे नव्हते. परंतु मी धमकी दिली असे दमानिया यांना वाटत होते तर त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या कॅमेर्‍यात हे सर्व कैद झाले आहे. मी धमकी दिली असेल तर तो पुरावा त्यांनी पत्रकारांपुढे सादर करावा. अंजली दमानिया यांच्याकडून माझी वारंवार बदनामी होत आहे. अगोदर अडीच वर्षा अगोदर केली आणि आता पुन्हा अण्णांच्या आंदोनात माझी पार्श्‍वभूमी खराब असून भुजबळांबरोबर संबंध असल्याचा आरोप केला. माझी पार्श्‍वभूमी खराब आहे असे त्या वारंवार सांगत असतील तर त्याबाबतचे कागदपत्र माध्यमांसमोर सादर करावे अन्यथा माझी माफी मागावी. या संदर्भात दमानिया यांना नोटीस पाठविण्यात आली असून माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

भोसरी एमआायडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी मंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या प्रकरणात गोवण्याचा पूर्व नियोजित कट होता असा आरोप अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील कोअर कमिटीच्या सदस्या कल्पना इनामदार यांनी बुधवारी केला आहे.
इनामदार यांनी सांगितले की, खडसे मंत्री झाल्यानंतर अंजली दमानिया यांचे पती अनिश यांनी मेव्हणे आणि दमानिया यांचे भाऊ कृष्णकांत मालप यांना सांगून मला त्यांच्या घरी बोलावले होते. त्यावेळी खडसे आणि अजित पवार यांच्याबाबत दुपारी साडेतीन तास चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर आपल्याला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते, असे मला अंजली दमानिया यांनी सांगितले. काही पत्र मी तुम्हाला देते ती घेऊन तुम्ही खडसे यांच्या ऑफिसला जा आणि त्यावेळी मी दिलेले पैसे खडसे यांच्या टेबलावर ठेवा. त्यानंतर मी मागून लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला घेऊन येते, असे मला सांगितले. मालप आणि माझी ओळख असल्याने मी त्यांचे हे काम करेन, असे त्यांना वाटले. पण त्यावेळी मी त्यांना यासाठी स्पष्ट नकार दिला. मी याची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी मला भुजबळांनी धमकी देण्यासाठी पाठवले, असे माझ्यावर खोटे आरोप केले. परंतु भुजबळांशी माझा कोणताही संबंध नाही, असे इनामदार यांनी यावेळी स्पष्ट केले.

बदनामीचा खटला दाखल करणार
आंदोलनात शेतकरी उभे केले मग मंचावर शेतकरी नेते का नव्हते असा असा प्रश्‍न केल्यावर माझ्या हातून माईक काढून मला धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.