एकनाथराव खडसेंचा भाजपाला पुन्हा सवाल

0

जळगाव जिल्ह्यातील माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुणे येथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याच कालावधित खडसे यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचेशी संवाद झाल्याचा हॅकर मनीे भंगाळे यांनी आरोप केल्याने खळबळ उहाली. हॅकर मनीष भंगाळेंनी केलेल्या आरोपाची रायशासनाने एटीएसमार्फत चौकशी केली पुढे हॅकर भंगाळे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. एकनाथराव खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात फोनवरून संभाषण झालेच नाही असा निष्कर्ष एटीएसने दिला. तथापि या दरम्यान एकनाथराव खडसे यांना मानसिक त्रास झाला, जो मनस्ताप झाला आणि समाजामध्ये त्यांचेविषयी जो गैरसमज झाला तो न भरून निघणारा आहे. त्यामुळे ते स्वपक्षीय शासनावर आपला वेळोवेळी रोष व्यक्त केला. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करायला ते मागे – पुढे पाहिले नाहीत कसलाही पुरावा नसतांना आरोप करणार्याांने आरोप केले. परंतु माझ्याविरुद्ध एकही पुरावा नसतांना मला दोषी धरण्यात आले. एका क्षणात खोट्या आरोपामुळे माझे 40 वर्षाचे राजकीय कारकीर्दीला गालबोट लागले गेले. 40 वर्षाची कारकीर्द धुळीस मिळाली. त्यासाठी गेल्या तीन वर्षापासून मंत्रीमंडळातून बाहेर आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपसाठी यांनी जीवाचे रान केले. शिवसेनेची युती तोडून पंगा घेतला. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपसमवेत बसला. भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसाीं शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर एकनाथराव खडसे यांनीही दावा केला होता. पक्षाचे येष्ठ नेते म्हणून तसेच पाच वर्षे विरोधी पक्षाचे नेते म्हणून यशस्वी कामकाज केलेल्या एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणे काही चुकीचे नव्हते. परंतु त्यांना मंत्रीमंडळातील दुसर्याा क्रमांकाचे असलेले महसूलमंत्रीपद दिले गेले. महसुल मंत्रीपदाव्यतिरिक्त त्यांचा अनुभव आणि अभ्यास लक्षात घेता त्यांचेकडे इतर महत्वाची सात खाती मुख्यमंत्र्यांनी सूपूर्द केलेली होते. त्यात कृती खात्यासारखे महत्वाचे खातेही होते. त्यांच्या दिड वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत कामाचा मोठा झपाटा सुरु केला होता. परंतु त्यांचे मागे शुक्लाकाष्ट लागले अन् मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यासाठी न्या. झोटिंग कमिशन नेमले गेले. सहा महिन्यात न्या. झोटींग कमिशनचा अहवालही आला. अहवाल खडसे यांच्या बाजूनेच असल्याचे सांगण्यात आले. परंतु माशी कुठे शिंकली कळत नाही त्यांना मंत्रीमंडळात मात्र अद्यापपर्यंत स्थान दिले गेले नाही. त्यांना सत्तेपासून दूर ठेवले गेले.
जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्येही गटबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मंत्री म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पक्षात झुकते माप दिले गेले. जिल्ह्यातील भाजप मोठा गट त्यांच्या पाठीशी उभा राहिला. जिल्ह्यातील भाजपचे सूत्रे सध्या ना. गिरीश महजन हेच चालवतात. एकनाथराव खडसेंना तेथे स्थान दिले जात नाही.
एकंदरित एकनाथराव खडसे हे पक्षावर कमालीचे नाराज आहेत. तरी सुद्धा गेल्या 40 वर्षापासून भाजपशी असलेल्या निष्ठेमुळे भाजपसोडून दुसर्याा पक्षात जाण्याची भूमिका ते घेत नाहीत. परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तात्वीकदृष्ट्याा पक्षावर तोंडसूख घ्यायला ते मागे-पुढे पहात नाहीत. अगदी विधानसभा अधिवेशनात सुद्धा जाहीरपणे आपली व्यथा स्पष्टपणे मांडायला ते कचरले नाहीत. आता योगायोगाने हॅकर सुजाने अमेरिकेत एका पत्रपरिषदेत 1914 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशिनमधल्या घोटाळ्यााची कल्पना गोपीनाथ मुंडे यांना होती म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. हॅकर सुजाने यांनी जरी असा आरोप केला असला तरी त्यावर भाजप सरकार विश्वास ठेवले नाही. परंतु हॅकर मनीष भंगाळे यांनी एकनाथराव खडसे आणि दाऊद यांचेत संभाषण सांगितल्यावर मात्र त्यावर विश्वास कसा काय ठेवला गेला ? असा सवाल आता एकनाथराव खडसे यांनी केला आहे. एकनाथराव खडसे यांच्या म्हणण्यात चुकीचे काही नाही. कारण हॅकर मनिष भंगाळेमुळे एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद गेले. त्यानंतर हॅकर मनिष भंगाळेच्या आरोपात तथ्य नसल्याचे खुद्द एटीएसन जाहीर केले. परंतु त्या आधी खडसेंना आपले मंत्रीपद सोडावे लागले त्याचे काय? एकंदरीत एकनाथराव खडसे हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्याचे काही चुकते आहे असे वाटत नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. त्या खडसेंची भूमिका महत्वाची ठरणार यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.