नवी दिल्ली :- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीफच्या ताफ्फ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राईकची कारवाई केली. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून आत्तापर्यंत 513 वेळा शंस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती ‘व्हाइट नाइट कोर’चे जनरल अधिकारी लेफ्टनंट परमजीत सिंह यांनी दिली.
परमजीत सिंह म्हणाले, की ”पाकिस्तानकडून गेल्या दीड महिन्यांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना 100 पेक्षा अधिक मोर्टार आणि तोफांसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला. विशेषकरुन पाकिस्तानने भारतातील मानवी वस्त्यांना टार्गेट केले. भारतीय लष्करानेही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले”.दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये झालेल्या गोळीबारात दोन मुलींसह चार जवान जखमी झाले.