भडगाव प्रतिनिधी
यावर्षाचा ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्याची लगबग सुरु झाली असून त्यापूर्वीच शासनाने, साखर संघाने ऊसाला हमी भाव म्हणून तीन हजार रुपये जाहीर करावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रदीपराव पंडीतराव पाटील यांनी व शेतकरी वर्गातून होत आहे.याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा व शेतकर्यांना दिलासा दयावा अशी मागणी होत आहे.
मागील वर्षी भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे विहीरींंनी तळ गाठल्याने बागायत, फळबागाईत धोक्यात आली होती अशा भीषण दुष्काळ परिस्थितीत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत त्याने रात्रपहाट करुन टँकरने फळबागा व बागायत पिकं जगवली उत्पन्न गेले तरी चालेल पण फळबागा वाचल्या पाहिजे म्हणून पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला ऐवढे करून काही शेतकर्यांना बागा जगवता आल्या नाहीत म्हणून न भरून निघणारे मोठे नुकसान झाले आहे. अशाही परिस्थिती शेतकरी मोठ्या आशेवर जगला असुन आता त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची तो मायबाप सरकार कडे आशाळभूत नजरेने पाहत आहे.
ऊस जरी नगदी पीक असले तरी ते मोठे खर्चिक पिक आहे. ऊस लागवडीपूर्वी मशागत व ऊस लागवडसाठी मोठी मेहनत,पैसा खर्च करावा लागतो तसेच ऊसबेणे, लागवड खर्च, कोळपणी. निंदणी, रासायनिक खते, इतर आंतरमशागत खर्च, व्यवस्थापन खर्च, आदी सर्व खर्च मोठ्या प्रमाणात लागतो त्या मानाने खरोखर ऊसाला आजपर्यंत कधी अपेक्षित असा भावच मिळाला नाही म्हणून ऊस उत्पादक शेतकर्यांना हे मोठे दुभाग्य आहे.
वास्तविक ऊसापासून साखर, इथेनॉल, मळी ,कागदासाठी लगदा, बाँयलर इंधन अल्कोहोल तर काही कारखन्यात वीज निर्मिती केली जाते असा एक कणनीकण कामात येणार्या पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव तरी मिळणे अपेक्षित आहे पण साखर कारखाना लाँबी ही सत्ताधारी, विरोधी सत्तेत असणार्या सर्वपक्षीय राज्यकर्तेच्याचीच साखर कारखाने आहेत म्हणून सरकार जास्त भाव देत नाही आणि विरोधी पक्षनेते भाव मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत नाहीत म्हणून दरवर्षी ऊसाला भाववाढीची मागणी करण्यात येते पण ती मागणी पूर्ण केली जात नाही. म्हणून ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत शेतकर्यांप्रती आस्था असणारी शेतकरी संघटना, राजकीय नेते याबाबत आक्रमक पवित्रा घेत नाही. ऊस गळीत हंगाम सुरु होतो तेव्हाच मागणी केली जाते त्यापूर्वी मागणी केली जात नाही म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा मागेच राहतो म्हणून सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकर्यांना न्याय दयावा अशी मागणी केली जात आहे.