चाळीसगाव :-चाळीसगाव विधानसभा मतदार संघात पक्षाकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे पण उमेदवारी कोणाला द्यायची ते पक्षश्रेष्ठी ठरवतील पस्तीस ईच्छूका मधून एकाच टिळा लागणार आहे. त्यामुळे यशाने हुरळून जाऊ नका, गाफील राहून चालणार नाही .मतदार संघात उमेदवार निवडीचा 90% स्ट्राईक रेट ठेवावा असा सल्ला प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी येथे दिला .
भारतीय जनता पक्षाचा चाळीसगाव तालुका बुथ व कार्यकर्ता मेळावा सोमवारी येथील वैभव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते प्रदेश उपाध्यक्ष खासदार सुभाष भामरे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले तर दिपप्रज्वलन खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव घोडे ,शेतमजुर आघाडीचे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस पोपट तात्या भोळे ,तालुका अध्यक्ष केबी साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, यु डी माळी ,सतीश दराडे, बेलगंगा चे चेअरमन चित्रसेन पाटील ,नगराध्यक्ष आशालता चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज स्वर्गीय अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. घृष्णेश्वर पाटील यांनी प्रास्तविक केले तर तालुका अध्यक्ष केबी साळुंखे व पोपटभोळे यांनी मेळाव्याचा उद्देश पक्षसंघटना बूथ रचना याविषयी माहिती दिली. खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व विकास याविषयी मार्गदर्शन केले.
डॉक्टर संजीव पाटील यांनी सांगितले की बूथ कार्यकर्ता हेच खरे सैनिक असून मतदान करून घेऊन आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. पक्षाने मला संधी दिली तर मी पण निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांनी कार्यकर्ते यांना काही प्रश्न विचारून केंद्रातील यशाने भारावून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आव्हान केले पक्षाची खरी ताकद बूथ प्रमुख व शक्ती प्रमुख हेच आहेत जळगाव जिल्हा अनेक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला आहे .मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडवणीस हेच होतील, सैन्यदलात लष्करामध्ये खानदेशी टक्का ते तीस टक्के आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सर्वेनुसार उमेदवारी दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की जुन्या पदाधिकाऱ्यांन पैकी एकाला उमेदवारी द्यावी ज्याला उमेदवारी दिली जाईल त्याला निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली .
या मेळाव्याचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस प्राध्यापक सुनील निकम यांनी केले तर आभार सरचिटणीस धनंजय मांडोळे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन कार्यालय मंत्री अरुण पाटील यांनी केले.