उपेक्षित दलित सामाजिक परिषद २४ जानेवारीला नाशकात

0

 चाळीसगाव (प्रतिनिधी) : वंश परंपरेने सफाईचे काम करीत असलेल्या देशातील व राज्यातील मेहतर, वाल्मिकी, रोखी,सुदर्शन व मुस्लिम मेहतर या उपेक्षित दलित समाजाच्या न्याय हक्कासाठी देशातील सात राज्यात कार्यरत असलेल्या शिवसेना समर्थक  उपेक्षित दलित सामाजिक परिषद या संघटनेच्या राज्य कार्यकारणी पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता नाशिक येथे माजी समाजकल्याण मंत्री व शिवसेना उपनेते बबनरावजी घोलप यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे.

या परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष व उपेक्षित दलितांचे  आशास्थान समाजाचे हृद्य सम्राट मुकेशजी सारवान माजी प्रदेशाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग हे येणार आहेत यात राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ व कोकण विभागाचे संघटनात्मक विस्तार तसेच वंशपरंपरेने सफाईचे काम करीत आलेल्या राज्यातील मेहतर,वाल्मिकी,सुदर्शन या उपेक्षित दलित समाजाच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी त्याप्रमाणे आगामी काळात राज्याचे मंत्रिमंडळात आणि उपेक्षित दलित समाजासही प्रतिनिधित्व मिळावे आणि सुलभ इंटरनॅशनल व इतर संस्थांना दिलेल्या सुलभ प्रसाधनगृहाचे  ठेके रद्द व्हावे व ते या उपेक्षित दलित समाजाच्या संस्थांना विनाशर्त द्यावे,राज्यात आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्व शिवसेना पक्षास परिषदेद्वारे अधिकाधिक बळकटी देण्यासाठी विचारविनिमय तसेच उपेक्षित दलित समाजाच्या प्रतिनिधींना शिवसेना पक्षात प्रतिनिधित्व मिळावे, माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर सफाई कर्मचाऱ्यांची हितासाठी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करण्यात यावी, शासनाने राज्यात सफाई कर्मचाऱ्यांची भरती करावी व त्यात वंशपरंपरेने सफाई काम करीत आलेल्या मेहतर, वाल्मिकी,रुखी, सुदर्शन या उपेक्षित दलित समाजातील युवकांना व युवतींना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे या गोष्टींवर विचारविनिमय केला जाणार आहे.

तसेच समाजाचा इतर बाबींवर चर्चा होणार असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित दलित सामाजिक परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. कृष्णा वाल्मिकी, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष श्री. शिवकिशोर, कर्नाटक राज्याध्यक्ष काशीराम चव्हाण, मध्य प्रदेश अध्यक्ष एम.के.ओढवाल, गुजरात राज्याध्यक्ष श्री.गोविंद भाई सोलंकी,हरियाणा राज्याध्यक्ष मुकेश कुमार रेवाडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सदर बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दलित सामाजिक परिषद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष सुनील तामोत, राज्य सरचिटणीस विनोद चव्हाण,राज्य उपाध्यक्ष किशोर समुंद्रे, राज्य सचिव संजय रिडलान,रामचंद्र पछेल,सुरेंद्र लाहोट,मुनीरसिंग झांझोटकर , जळगाव जिल्हा उपेक्षित दलीत सामाजिक परीषदचे अध्यक्ष  मा.राकेशजी रील, उपाध्यक्ष तुषार मधुकर नकवाल (चाळीसगाव) यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.