Saturday, December 3, 2022

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी दीपक सावळे

- Advertisement -

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   

- Advertisement -

तालुक्यातील धार येथील रहिवासी दीपक सावळे यांची केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेल्या सामाजिक कार्यकर्ता सदस्य म्हणून उप विभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

- Advertisement -

शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी उपविभाग स्तरावर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.  यात उपविभागीय अधिकारी एरंडोल हे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल, पारोळा, धरणगाव यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती असून सदर समितीची पहिली सभा  आठ तारखेला पंचायत समिती हॉल एरंडोल येथे आयोजित करण्यात आली आहे. समितीवर झालेल्या नियुक्तीबद्दल दिपक सावळे यांचे जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी अभिनंदन केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या