Thursday, September 29, 2022

उपलखेडा येथील बालकाचा शॉक लागल्याने मृत्यू

- Advertisement -
– दहा वर्षापूर्वीच हरविले आहे वडिलांचे छत्र
पाचोरा  प्रतिनीधी
      उपलखेडा ता. सोयगांव येथील १५ वर्षाचा बालक केस कापण्यासाठी गेलेला असतांना संबंधीत न्हाव्याकडे गर्दी असल्याने त्याचा नंबर येईपर्यंत दुकाना जवळ उभा असतांना अचानक रोहित्र (ट्रान्सफार्मर) जवळील खांबाचा तार तुटुन अंगावर पडला. पडलेला तार हाताने हिस्का देवुन दुर करत असतांना विजेचा प्रवाह असलेल्या ताराचा गळ्याला फास अडकुन त्यात तो जागेवरच ठार झाला. मयताचे वडिलांचे गेल्या १० वर्षांपूर्वी निधन झालेले असुन भुमीहीन असलेली आई दोन मुल व १० वर्षाच्या मुलीचा मोलमजुरी करून सांभाळ करत आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल करुन सोयगांव पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.
        उपलखेडा ता. सोयगांव जि. औरंगाबाद येथील रतीलाल श्रावण पवार (वय – १५) याचे वडिलांचे दहा वर्षापूर्वी निधन झालेले असल्याने व स्वत: कडे जमिनीचे एक तासही नसल्याने शेळ्या सांभाळून संसाराचा गाडा ओढण्यासाठी आपल्या विधवा आईस मदत करीत होता. परिस्तथीती बिकट असल्यामुळे रतीलाल यास शाळेचा कधी तोंडच बघण्याचा योगच आला नाही. तर त्याच्या पेक्षा वयाने मोठा असलेला भाऊही गावातील व्यक्तींसोबत ऊस तोडणीसाठी जावुन आईस मदत करीत आहे. दि. १९ रोजी यतीलाल हा नित्याप्रमाणे गावाजवळच असलेल्या पाचोरा व कन्नड तालुक्याच्या सिमालगत असलेल्या डोंगर टेकड्या वरुन शेळ्या चारुन घरी आल्यानंतर त्यास केश कर्तन करायचे असल्याने सायंकाळी ५:३० वाजता गेला होता. मात्र त्याठिकाणी अगोदरच ग्राहक असल्याने रतीलाल हा टपरीजवळ आपला नंबर येण्याची वाट पाहत उभा होता. जवळच असलेल्या रोहित्र (ट्रान्सफार्मर) च्या तारांमध्ये घर्षण होऊन तार अचानक तुटुन त्याचे खांद्यावर पडली. सदरची बाब वक्षात येताच तारेला हातात धरुन दुर फेकण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तार त्याचे गळ्याभोवती आवळीजावुन तारेत विज प्रवाह असल्याने तो जागेवरच ठार झाला. घरची परिस्थिती नाजुक असल्याने विज वितरण कंपनीचे अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी ढुंकूनही पाहिले नाही. विजेचा शाॅक लागल्याने रतीलालचे संपूर्ण शरीर काळेकुट्ट पडले होते. त्याचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालये वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले.
*बाजार आटोपल्यानंतर घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला*
      उपलखेडा येथे दर गुरुवारी आठवडे बाजार असतो. या बाजारात तितुर, धाप (तांडा) येथील अनेक नागरिक येत असतात. आठवडे बाजार याच ठिकाणी भरत असल्याने बाजारात मोठी गर्दी असते. दरम्यानच्या काळात विजेची तार तुटली असती तर मोठी जिवीतहानी झाली असती. या खांबावरील तारांमध्ये नेहमीच स्पार्किंग होत असते याबाबत नागरिकांनी अनेक वेळा बनोटी येथील सब स्टेशनमध्ये जावुन तारा व्यवस्थित करण्यासाठी तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र विज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती. याबाबतीत अतिशय तीव्र शब्दात मयत मुलाच्या काका यांनी आमच्या प्रतिनीधींशी बोलतांना सांगितले.
- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या