पिलखोड ता. चाळीसगांव : दिनांक 15/4/2021 रोजी रात्रीच्या सुमारास उपखेड गावातून मालक पंडित माणिक पाटील रा.उपखेड यांची तीन गुरे चोरीला गेली.एक मोठी गाय एक मोठी वासरी एक मोठा गोरा मराठी शाळेजवळून चोरीला गेली अद्याप त्यांचा कोणताही तपास लागलेला नाही. तसेच आठ महिन्यापूर्वी संत जनार्दन स्वामी आश्रम उपखेड येथून देखील एक गाय चोरीला गेली होती.तिचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही.अजूनही दोन तीन जणांचे गुरे चोरीला गेले आहेत.या गुरांचा ही कोणत्याही प्रकारचा तपास लागलेला नाही.त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी मध्ये भीतीचे वातावरण आहे.प्रशासनाने याची खबरदारी घेऊन कडक पावले उचलावीत. ही सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे.