उन्हाळयाची तिव्रता वाढली ː कृत्रिम पाणवठयात खाजगी टँकरव्दारे जलपुनर्भरण

0

जळगांव | प्रतिनिधी
पाटणादेवी जंगल परिसरात वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन निर्माण करण्यात आलेले 16 कृत्रिम पाणवठे खासगी टँन्करव्दारे भरण्यात येत आहे. जंगल परिसरात अन्नसाखळी सोबतच पाण्याची उपलब्धता असावी. यासाठी हे पाणवठे तयार केले असून, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे मार्चच्या दुस-याच पंधरवाड्यात ते कोरडे पडले. यामुळेच खासगी टँन्करने त्यात जलपुनर्भरण करण्यात येत असल्याची माहिती जात असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सरदेसाई यांनी दिली आहे.
शहरापासून सुमारे 18 किमी अंतरावर विविध वृक्ष संपदा आणि हिरवाईने नटलेला पाटणादेवी परिसरात सद्यस्थितीत नैसर्गीक पाणवठयातील जलपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वनपरीक्षेत्रात निर्माण करण्यात आलेल्या 16 कृत्रिम पाणवठयांमधे खाजगी टँकरव्दारे जलपुनर्भरण करण्यात येत आहे. या वनपरीसरालगच असणार्‍या गौताळा अभयारण्यामुळे येथे जंगली श्वापदांसह विविध दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांचा अधिवास मोठ्या संख्येने आहे. मे 2018 च्या प्राणी गणनेत चपाळीसगांव जंगल परिसरात पाचहून अधिक बिबटे असल्याच्या नोंदी आहेत. अनेकविध दूर्मिळ पक्षी व मोठ्या संख्येने रानडुक्कर आणि माकडांच्या टोळ्या जंगलात आहे. परिसरात इतरत्र अभावाने आढळणार्‍या अनेक वनऔषधी, जंगली वनस्पती ेदखिल आहेत.दरवर्षांपेक्षा यावर्षीचे पर्जन्यमान सरासरी गाठू न शकल्याने जंगलातील अनेक जलस्त्रोत उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच आटले आहेत. तर काही नैसार्गिक पाणवठ्यांनी तळ गाठला आहे. या जंगल वनपरीक्षेत्रात वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाण्याचे दूर्भिक्ष्य लक्षात घेऊन साडे सहा हजार हेक्टर जंगल परिसरात गेल्या काही वषार्पूर्वी 16 कृत्रिम पाणवठे वनविभागाने तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी एप्रिल किंवा मे नंतरच त्यात पाणी भरावे लागत असे. मात्र यावर्षी मात्र वन्य जिव पशुपक्षी प्राण्यांना योग्य त्या प्रमाणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे. म्हणून मार्च महिन्याच्या पासूनच वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठयांच्या ठिकाणी टॅकरव्दारे पाणी साठवण केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.