उन्मेष पाटलांच्या प्रचारासाठी महिलांच्या कॉर्नर बैठका

0

जळगाव-
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय(ए), रासप, शिवसंग्राम, महायुतीचे जळगाव लोकसभेचे अधिकृत उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचार जळगाव शहरामध्ये अतिशय जोमाने सुरु आहे. यात महिला आघाडीतर्फे कॉर्नर सभा घेण्यात येत आहे. 7 एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात झाली असून यामध्ये प्रभाग 1, 2,8,13,11,7,3,9,14 व 15 इत्यादी प्रभागांमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार अतिशय जोमाने झाल्या. यात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यासोबत महायुचीचे उमेदवार उन्मेष दादा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जिल्हा महानगराध्यक्ष आ.राजूमामा भोळे प्रचारात सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यत सहभाग होत असून यानंतर जी.एम.फौंडेशन येथे विविध आघाडी प्रमुख अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र यांच्या बैठका घेऊन प्रचाराची आखणी करीत आहेत. याच अनुषंगाने महिला आघाडीला सुद्धा जबाबदारी देण्यात आली असून जळगाव शहराच्या महापौर सिमाताई भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.11 एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी 5.00 वा. जी.एम.फौंडेशन येथे भाजपच्या महिला जिल्हापदाधिकारी महिला मंडल अध्यक्षा, युतीच्या नगरसेविका यांच्या बरोबर महत्वपूर्ण बैठक घेऊन असे ठरले कि महानगरातील 19 प्रभागात महिला आघाडीच्या नगरसेविका व पदाधिकारी व माजी नगरसेविका या आपापल्या प्रभागामध्ये महिला मंडल बचत गट भजनी मंडळ व सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना भेटून व त्यांच्या समवेत कॉर्नर मिटिंग घेण्याचे ठरले. या बैठकी प्रसंगी प्रभागनिहाय बैठका घेण्याच्या जबाबदार्‍या महिलांवर सोपविल्या.

या बैठकी प्रसंगी महिला बाल कल्याण सभापती मंगला चौधरी, जिल्हा पदाधिकारी व नगरसेविका उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, सरिता नेरकर, वैशाली पाटील, शरीफा तडवी, वंदना पाटील, नगरसेविका सिंधुताई कोल्हे, भारती सोनवणे, मीनाक्षी पाटील, रंजना वानखेडे, सुचिता हाडा, प्रतिभा कापसे, प्रिया जोहरे, ज्योती निंभोरे, रेश्मा काळे, सुरेखा तायडे, जयश्री पाटील, गायत्री शिंदे, गायत्री राणे, शोभा बारी, पार्वता भिल, कांचन सोनवणे, योगिता तिवारी, सना खान, प्रतिभा पाटील, अंजनाबाई सोनवणे, मीना सपकाळे, रेखा पाटील, सुरेखा सोनवणे, हसिनाबी शेख, ज्योती तायडे, मंगला चौधरी, रेश्मा काळे, लता सोनवणे, जिजाबाई भापसे आदि महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.