उन्नाव बलात्कारप्रकरणी आज निकाल

0

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज सोमवारी निकाल देऊ शकते. या प्रकरणात भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर या बलात्काराचा व अपहरणाचा आरोप आहे.. त्याची सहकारी शशी सिंहच्या विरोधातही न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. सेंगरवर २०१७ मध्ये एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेनगर व सहआरोपी शशि सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here