Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»उद्योजक होण्याचा निर्णय शिक्षण घेत असताना केल्यास फायदेशीर
    जळगाव

    उद्योजक होण्याचा निर्णय शिक्षण घेत असताना केल्यास फायदेशीर

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 6, 2018No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    डॉ.अजित मराठे यांचे प्रतिपादन ; सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या शाखेची स्थापना

    जळगाव;-

    आयुष्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ, ती एकदाच येणार आहे योग्य तज्हेने तिचा उपयोग करायचा असेल तर उद्योजक होण्याचा निर्णय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच घेतला तर फायदेशीर ठरतो असा सल्ला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्‍वस्त व एनआरडीएल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अजित मराठे यांनी व्यक्त केले.
    उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत विद्यापीठात शिक्षण घेणाज्या विद्याथ्र्यांसाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या शाखेची स्थापना रसायन तंत्रज्ञान संस्थेत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर होते. यावेळी व्यासपीठावर सॅटर्डे क्लब जळगावचे पदाधिकारी व्ही.पी.कुळकर्णी, सचिव नरेंद्र बगाडे, प्रा.बी.एल.चौधरी उपस्थित होते.
    श्री. पुढे मराठे म्हणाले की, विद्याथ्र्यांनी पौशांची तुलना न करता ज्ञानाची तुलना केल्यास भविष्य उज्वल आहे. ज्ञानाचा उपयोग केल्यास यशस्वी उद्योजक व्हाल. उद्योजक हा स्वत: काम करीत नाही त्याची सिस्टीम काम करते तेव्हा काय करायचे आहे ते ठरवा वेळ व्यर्थ घालवू नका त्यासाठी मानसिक तयारी करा. प्रसिध्द उद्योजकांनीही स्वत:चा मार्क तयार केला आहे. तुम्हीदेखील जगावर छाप उमटविण्यासाठी तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा. उद्योजक होण्यासाठी छोटघा व्यवसायापासून सुरूवात करा त्यासाठी आधी विक्रेता व्हावे लागते ज्याला विकता येते तो प्रसिध्द उद्योजक होऊ शकतो यासाठी विद्याथ्र्यांना उद्योजकांशी संवाद साधण्याचे आणि उद्योजक घडवायचे काम हा क्लब करेल. तरूण विद्याथ्र्यांना उद्योजक होण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा क्लब आता महाराष्ट्रभर काम करणार आहे ज्यामुळे महाराष्ट्र बलशाली होईल यात शंका नाही. अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी उद्योजक होणं कठीण नाही, चांगला युवक हा शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक होऊ शकतो असे सांगुन विद्यापीठातील या शाखेचा निश्‍चितच फायदा होईल असे सांगितले. व्ही.पी.कुळकर्णी यांनी सॅटर्डे क्लबची भूमिका मांडली तर नरेंद्र बगाडे यांनी विद्याथ्र्यांच्या विविध कल्पनांना मार्केटमध्ये काम क्लबच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ.ए.के.गोस्वामी यांनी स्टार्टअप सेलसंबंधी माहिती दिली. विद्यापीठात स्थापन केलेल्या शाखेत प्रियंका पाटील (अध्यक्ष), सोमेश पाटील (सचिव), प्रियंका बोरसे, साखी गुमनानी (सहसचिव) म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कविता मंडोरे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif