उद्योग क्षेत्रात अभियांत्रिकीचे भवितव्य उज्ज्वल

0

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फॉनिक्स 2018 स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी एम.एम. बिरादर यांचे प्रतिपादन

जळगाव दि. 15-
युरोपीयन देशांनी आपली आर्थिक प्रगती साध्य केली आहे. मात्र आशिया आणि अफ्रिकन देश मात्र त्या तुलनेने पिछाडीवर राहीले आहे. औद्योगीक विकासाच्या दृष्टीने अभियांत्रिकीचे महत्व कायम असुन उद्योग क्षेत्रातच अभियांत्रिकीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन रेमण्ड कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक एम.एम.बिरादर यांनी आज येथे केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज फॉनिक्स 2018 या संशोधनात्मक स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून एम.एम. बिरादर, विजय बुवा, भास्कर बोरोले, प्राचार्य डॉ. व्ही.जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक, प्रा. विजय चौधरी, विभागप्रमुख प्रा. व्ही.एच.पाटील हे उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार योगीता पाटील या विद्यार्थीनीने मानले. यशस्वीतेसाठी प्रा. व्ही.व्ही. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन तांगडे, राजेश उबाळे, तरूण सिंग हे परीश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.