मुंबई : उद्या १ डिसेंबर पासून Flipkart Flipstart Days sale सुरु होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. एसी, फ्रिज आणि वस्तूवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
हा सेल १ डिसेंबर पासून सुरू ते ३ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्टवरच्या या सेलमध्ये सर्व कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर सूट मिळणार आहे. यात कपडे, फुटवेयर, एक्सेसरीज, ब्यूटी, स्पोर्ट्स, फर्निचर, होम डेकोर, आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे.
फ्लिपकार्टवर या सेलसाठी एक लँडिंग पेज बनवले आहे. या पेजवर ऑफर्सची माहिती दिली आहे. या सेलमध्ये हेडफोन्स आणि स्पीकर्स वर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. बेस्ट सेलिंग लॅपटॉप ३० टक्क्यांपर्यंत सूट सोबत विक्री उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय वियरेबल, स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड्स ला या सेलमध्ये १२९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर्स आणि एक्सटेंडेड वॉरंटी यासारखे ऑफर्स दिले जाणार आहे. स्मार्ट टीव्हीला या सेलमध्ये केवळ ८ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते.
फ्लिपकार्ट सेल दरम्यान खरेदी करणाऱ्या प्रोडक्टला आता विशलिस्ट करण्याचा ऑप्शन देत आहे. सध्या कमी संख्येत या प्रोडक्ट्सची विशलिस्ट करण्याचा ऑप्शन आहे. फ्लिपकार्टच्या फ्लिपस्टार्ट डेट सेल मध्ये मोबाइल अॅक्सेसरीजला १२९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. रेफ्रीजरेटर्स आणि टीव्ही वर ४० टक्क्यांपर्यंत सूट सोबत उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच फ्लिपकार्ट ‘Deals Of the day’ आणि लॅपटॉप सह दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वर हॉट डिल्स दिले जात आहे.