मुंबई : विधानसभेचे सदस्य आणि वडाळ्याचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोळंबकर यांनी राजभवनात शपथ घेतली. दरम्यान, राज्यपालांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश विधिमंडळाला दिले आहेत. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभेचे अधिवेशन सुरु होईल. कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याचं काम करतील. त्यानंतर विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल.