उद्यापासून धावणार भुसावळ-सुरत विशेष रेल्वे

0

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ-सुरत व भुसावळ-नंदुरबार येथे जाण्यासाठी २ मार्चपासून आता भुसावळहून दररोज गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर भुसावळ-बांद्रा टर्मिनसदरम्यान सात मार्चपासून त्रिसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात येणार आहे. यात गाडी क्रमांक ०९०१४, गाडी क्रमांक ०९००८ व गाडी क्रमांक ०९०७८ या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांत व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.

गाडी क्रमांक ०९०१४ अप विशेष गाडी ७ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी भुसावळहून सायंकाळी ५.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनसला पहाटे ४.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९०१३ डाऊन ही गाडी ७ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी बांद्रा टर्मिनसहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी भुसावळला दुपारी १२ वाजता पोहोचेल.

Leave A Reply

Your email address will not be published.