जळगाव : शहरातल्या १६ व्यापारी संकुलातील गाळे सील करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. दरम्यान, गाळे सील न करण्यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करूनही मनपाकडून जळगावातील गाळे सील करण्यात येत असल्यामुळे उद्यापासून शहरातील १६ व्यापारी संकुलातील सर्व गाळे बंद ठेवण्यात येणार आहे.
जळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू मार्केट येथे घेण्यात आलेल्या गाळेधारकांच्या बैठकीत बेमुदत बंदच निर्णय घेण्यात आला आहे.