मुंबई : महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीचा सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.उद्या २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.