उद्धव ठाकरेंनी सहपत्नी जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

0

मुंबई ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी विधान परिषद सदस्य नीलम गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे आणि अमोल मितकरी यांना उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी कधीही  निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे निवडणूक लढवणारे शिवसेनेचे पहिले पक्ष प्रमुख ठरले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.