उत्तर महाराष्ट्रात आयकरच्या छापेमारीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

0

नाशिक :- गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या आयकर विभागाकडून हॉस्पिटलची तपासणी सुरु होती. आयकर विभागाने ३० हॉस्पिटलवर टाकलेल्या छाप्यानंतर अनेक कागदपत्रे या अधिकाऱ्यांच्या हाती लागली लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीत आतापर्यंत १० कोटींची बेहिशोबी रोकड, सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केल्याची चर्चा आहे. तिसऱ्या दिवसी ही मोहीम काही ठिकाणी थांबवली आहे. तर काही हॉस्पिटलमध्ये ही चौकशी चौथ्या दिवशीही सुरुच राहणार आहे.

जळगाव धुळे व नाशिक, या जिल्ह्यात एकाचवेळी आयकर विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली. ५५ पथक, १६ अधिकारी २६५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोठी कारवाई केली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र हादरले. आयकर विभागाच्या या छाप्यामध्ये सरकारी योजनातून घेतलेल्या लाभाची चौकशी केली जात असून बेहिशोबी रिसीट व संशयास्पद कागदपत्रावरही विचारपुस करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या छाप्याबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण गोपनीयता ठेवत अधिकृतपणे कोणतीच माहिती जाहीर न केल्यामुळे चर्चेलाही उधाण आले आहे.

जळगाव शहरातील आयकर विभागाने काही रुग्णालयामधील महत्वाची कागदपत्रे, फाईल्स, संगणकाच्या हार्डडीसस्क घेवून गेले आहे. मागील वर्षी देखील आयकर विभागाकडून जळगावातील काही डॉक्टरांची तपासणी करण्यात आली होती. परंतु पहिल्यांदाच सलग तीन दिवस एकाचवेळी आठ नामांकित हॉस्पिटलांची तपासणी करण्यात आल्याने खडबड उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.