उत्तर महाराष्ट्रातील ८ ही जागा जिकू- ना.गिरीष महाजन

0
17

जळगाव:- उत्तर महाराष्ट्रातील ८ ही जागा जिकू असा दावा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी केला. जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जळगाव ग्रामीण, धरणगाव व जळगाव शहर विधानसभा क्षेत्राच्या महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. गिरीष महाजन बोलत होते.

व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेनेचे माजीमंत्री सुरेशदादा जैन, आ. चंदुलाल पटेल, शिवसेनेचे जिल्हा प्रभारी संजय सावंत,आ. किशोर पाटील, जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेश पाटील, आ. राजुमामा भोळे, ना. उज्वला पाटील, महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, गटनेते ललीत कोल्हे, आरपीआयचे अनिल अडकमोल, जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जि.प.सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक नितीन लढ्ढा, सुनिल महाजन, विष्णू भंगाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर), माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना ना. महाजन म्हणाले की, अहमदनगरचे निवडणूकीची जबाबदारी माझ्याकडेद्या अशी मागणी मी मुख्यमंत्री यांच्या कडे केली होती. परंतु माझ्या कडे न दिल्यामुळे भाजपला १४ जागांनवर समाधान मानावे लागले होते. पंरतु आता नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील आठ ही जागा जिकू असा दावा महाजन यांनी केला.

जळगाव मतदार संघात पक्षाने तरुण कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला असून त्याला आपण नक्कीच दिल्लीला पाठवू, मागच्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला जळगावातून 80 हजारांचे मत्ताधिक्क होते. यावेळी त्यापेक्षा अधिक राहील. उन्मेश पाटील यांना सर्वाधिक मताधिक्क मिळून देण्यासाठी सर्व तालुक्यांची स्पर्धा सुरु आहे. जिल्ह्यात 11 आमदार भाजपचे आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या युतीच्या ताब्यात आहे, असेही ना.महाजन म्हणाले.

भाऊ आपल लव्ह मॅरेज कायम ठेवा- ना. गुलाबराव पाटील

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सेनेची युती तुटली असल्याने विधानसभेत दोघांना आपल्या स्वबळावर लढावे लागले होते. त्यानंतर आता लोकसभेत पून्हा युती झाली असून गिरीश भाऊ आपल लव्ह मॅरेज कायम ठेवा अस मिश्‍कील टोला राज्यसहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगाविला.

जिल्ह्याचा काळापालट करणार – उन्मेश पाटील

सरकार व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची संधी देण्यासाठी पक्षाने उमेदवारी जाहीर केले. ही निवडणूक सक्षम राष्ट्र भारत घडविण्याची निवडणुक आहे. 500 कोटी रुपयांचा वरखेडी-लोंढे बॅरेज प्रकल्प, जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास व केंद्राच्या भक्कम योजनांमधून जिल्ह्याचा कायापालट करणार असल्याचे जळगाव लोकसभेचे उमेदवार आ. उन्मेश पाटील यांनी सांगितले.

आ. उन्मेष पाटलांना निवडून द्या – सुरेशदादा जैन

येत्या २३ तारखेला मतदान होणार असुन आ. उन्मेष पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी मेळ्यात केले. यावेळी त्यांनी ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात मनापा निवडणूक लढविलेली होती . परतु पक्षभेद विसरुन सर्वांनी एकत्र लढावे असे आवाहन सुरेशदादा जैन यांनी केले.

अमळनेरच्या घटनेचा मेळाव्यात निषेध 

अमळनेर महायुतीच्या मेळाव्यात झालेल्या घटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध करीत ना. पाटील म्हणाले की, भाऊ मी सकाळपासून बॅटींग करीत आहे तुम्ही देखील फायटींग करुन आले असल्याचे ना. महाजन यांनी पाटील यांना टोला लगाविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here