उत्तर महाराष्ट्रातील पराभवाचा भाजप तयार करणार अहवाल !

0

रोहिणी खडसेंच्या पराभवाचं विश्लेषणही येणार पुढे

नाशिक: विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. दरम्यान, खडसेंच्या नाराजीनंतर भाजपनं आता ‘डॅमेज कंट्रोल’चा पवित्रा घेतला आहे. खडसेंचं प्रभावक्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पराभव का झाला, याचा अहवाल भाजपकडून तयार केला जाणार आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या पराभवाचं विश्लेषणही यातून पुढं येणार असल्यानं त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार व माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

मुक्ताईनगर या भाजपच्या पारंपरीक मतदारसंघातून खडसे यांना प्रथम उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. पण पक्षविरोधी कारवायांमुळे तिला पराभवाला सामोरे जावे लागले. यासह उत्तर महाराष्ट्रातील १२ जागांवर भाजपचा पराभव झाला. त्याची नेमकी कारणं काय आहेत, याचा अहवाल बनविण्यात येणार नाही. तो अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,’ असं शेलार यांनी सांगितलं.

गेल्या पाच वर्षांत पक्षांतर्गत राजकारणापासून दूर ठेवले गेलेले एकनाथ खडसे सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाच्या दुसऱ्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी पक्षाला आव्हान दिलं आहे. भाजपमध्ये राहीन की नाही याचा भरोसा नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. भाजपमधील नाराज ओबीसी नेत्यांची मोटही त्यांनी बांधली आहे. त्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. खडसे यांची नाराजी दूर करावी, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.