उत्तर प्रदेशात पावसाचे थैमान ; १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या

0

लखनऊ :- उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने १५ जणांचे बळी घेतले आहेत. गेल्या चार दिवसात जोरदार पाऊस कोसळत असून या पावसात २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १३३ इमारतींना धोका पोहोचला असून त्या कोसळल्या आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शनिवारीपासून पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, आसाम राज्यातही पूर असून मिझोरामलाही पुराने वेढले आहे. अनेक गावे आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तसेच बिहार राज्यातही पाऊस कोसळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.