उत्तर प्रदेश : गायींच्या मृत्यूप्रकरणी आठ अधिकारी निलंबित

0

लखनौ : उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधील गायींच्या मृत्यूप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने दोषी आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. रात्री उशिरा मिर्झापूरचे मुख्य पशू चिकित्सा अधिकारी, अयोध्येचे बीडीओ यांच्यासहित एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अयोध्याचे जिल्हाधिकारी, मुख्य चिकित्सा अधिकारी आणि मिर्झापूरच्या डीएमना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच गायींच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी विंध्याचलच्या आयुक्तांकडे सोपवली आहे.

प्रयागराज आणि मिर्झापूर येथील गायींच्या मृत्यूंना जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या, हरदोई, रायबरेली, मिर्झापूर, प्रयागराज, सीतापूर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. गायींबाबत निष्काळजीपणा केला आणि त्यांचा मृत्यू झाला तर निष्काळजीपणा केल्याबद्दल गोहत्या अधिनियम आणि पशू क्रूरता निवारण कायद्यान्वये कारवाई केली जाईल असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.