उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने प्रमाेद भालेराव यांचा सन्मान

0

चोपडा – तालुक्यातील कर्जाणे येथील आश्रमशाळेतील क्रीडा शिक्षक प्रमोद गंगाराम भालेराव यांना जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय उत्कृष्ट अॅथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ट अॅथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात अाला.
खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते प्रमाेद भालेराव यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रांगणात प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार वितरण खासदार उन्मेष पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कर्जाणे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शरद मोरे, राष्ट्रीय खेळाडू बन्सी माळी, प्रा. इक्बाल मिर्झा, डॉ. विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वर्गीय महेश मधुकर वेरुळकर स्मृती उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार शालेय गटातून जामनेरचे ललित लक्ष्मण गावंडे व महाविद्यालयीन गटातून रावेरचे आसिफ हमीद तडवी यांना तर स्वर्गीय जितेंद्र शरद ठाकरे स्मृती खुला गट पुरस्कार जळगावचे किशोर विश्वनाथ सूर्यवंशी व उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार चोपडा येथील प्रमोद गंगाराम भालेराव यांना देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.