चाळीसगाव- येथील चाळीसगाव एजुकेशन सोसायटीचे केशव रामभाऊ कोतकर आर्टस् सायन्स आणि कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय म्हणून तिसरा क्रमांकाचा पुरस्कार रु ५००००/- चे पारितोषिक जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री मा. नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा बी आर येवले व क्रीडा संचालक खुशाल देशमुख याना देण्यात आले यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे , जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय म्हणून देण्यात येणारा हा पुरस्कार या महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच भेटल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी चा ए सोसायटीचे मॅन बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण उपाध्यक्ष मिलिंद देशमुख सचिव डॉ विनोद कोतकर क्रीडा समितेचे चेअरमन क मा राजपूत, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन नानाभाऊ कुमावत संस्थेचे सर्व संचालक यांनी प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य प्रा बी आर येवले व क्रीडा संचालक खुशाल देशमुख यांचे अभिनंदन करून कौतुक केले