नवी दिल्ली | 2021च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने महिलांना एक नवीन भेट दिली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत एक कोटी नवीन गॅस कनेक्शन देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच उज्वला योजनेचा विस्तारही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
उज्वला योजना अंतर्गत शासन गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करते. या योजने अंतर्गत शासनाने गरीब कुटुंबांना 1600 रुपये देण्याचे ठरवले आहे. नवीन एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यावर हे पैसे मिळतील. यासोबतच आता गॅस स्टोव्ह आणि नवीन सिलेंडर घेतल्यानंतर EMI ची सुविधाही देण्यात आली आहे.
उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी कोणतीही BPL महिला अर्ज करू शकते. यासाठी योजनेचा KYC फॉर्म भरून गॅस सेंटरमध्ये जमा करावा लागणार आहे. अर्ज करताना आपल्याला 14.2 किलोग्रॅम आणि 5 किलोग्रामचे सिलेंडर हे दोन पर्याय समोर असतील. या योजनेला अर्ज करण्याआधी महिला BPL मधील असावी, 18 वर्ष वय पूर्ण असणे गरजेचे, बँकेत खाते असणे गरजेचे, अर्जदाराच्या नावावर आधी गॅस कनेक्शन नसावे.

