उज्जैनकर फाउंडेशनतर्फे स्व.अशोक फडके विद्यालयास १५ पुस्तकं सप्रेम भेट

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कु-हा- काकोडा येथे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी विविध लेखकांचे १५ पुस्तकं भेट दिलीत त्यामध्ये पंख पिसारा व्यक्ती चरित्र, शिवचरण उज्जैनकर, मुक्ताईनगर ,संत वियोगी महाराज विभूती चरित्रग्रंथ , फाऊंडेशनचे ज्येष्ठ संचालक निंबाजी हिवरकर काकोडा , मेळावा कथासंग्रह, फाऊंडेशनचे सचिव प्रमोद पिवटे,मुक्ताईनगर ,देव भेटलेला विद्यार्थी, कथासंग्रह चंद्रकांत भंडारी ,जळगाव सांजवेळ लेख संग्रह ,सौ माधुरी महाजन कु-हा- काकोडा, काव्य दर्पण, काव्यसंग्रह घनश्याम, वरणगाव , धाडसीराम, बालकादंबरी प्रा.देवबा पाटील, खामगाव, भावामाला त्रेमासिक, डॉ. प्रल्हाद वावरे, पुसद नुपूर डंख काव्यसंग्रह कै.राम कदम, ठाणे ,हास्य गाथा शीलवंत वाढवे, नांदेड, संत चरित्रकार सुदाम सावरकर कै. डॉ गिरीश खारकर, अमरावती, गंध मातीचा कथासंग्रह, आनंदा पाटील फत्तेपूर ,एक राष्ट्रीय मंत्र बेटी बचाव बेटी पढाव ,वैचारिक कथा गोविंद पाटील ,धरणगाव, हिरव हिरव रान ,बालकविता संग्रह, मिलिंद राज पंडित ,इगतपुरी ,जीव इथं रमत नाही कवितासंग्रह ,ना.तू. पोधे, औरंगाबाद, अशा विविध साहित्यिकांची २०६५ रुपयांची पुस्तके प्रसंगी उज्जैनकर यांनी या विद्यालयास सप्रेम भेट दिलीत उज्जैनकर यांनी यापूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालय,पारंबी, शिवाजी हायस्कूल, कु-हा-काकोडा , नगरपंचायत वाचनालय ,मुक्ताईनगर ,गायत्री सार्वजनिक वाचनालय, मुक्ताईनगर ,रहनुमा सार्वजनिक वाचनालय ,मुक्ताईनगर आदी विविध शाळा व वाचनालयास अनेक पुस्तकं सप्रेम भेट दिलेली आहेत. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  व्ही. एस. चौधरी , पी.एम.घोगरे , प्रा. मनोज वाघ, प्रा.अतुल तेली,  गजानन गलवाडे ,योगेश पाटील  ,चि.अरविंद उज्जैनकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.